महाराष्ट्र पॉवर कॉन्क्लेव्हमध्ये ऊर्जा निर्मितीवर चर्चा

महाराष्ट्र पॉवर कॉन्क्लेव्हमध्ये ऊर्जा निर्मितीवर चर्चा

Published on

महाराष्ट्र पॉवर कॉन्क्लेव्हमध्ये ऊर्जा निर्मितीवर चर्चा

मुंबई, ता. ८ : राज्याच्या ऊर्जा क्षेत्राच्या भवितव्याला आकार देणे, स्वच्छ ऊर्जानिर्मितीवर भर देणे, या क्षेत्रातील स्मार्ट उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शोध घेणे, आदी बाबींवर नुकताच इंडियन इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इमा)तर्फे आयोजित महाराष्ट्र पॉवर कॉन्क्लेव्हमध्ये विचारविनिमय करण्यात आला.
या क्षेत्रातील मुख्य लाभधारक, भागधारक, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज यांना या कार्यक्रमात एकत्र आणले गेले. ऊर्जा संक्रमण क्षेत्रातील संधी आणि आव्हानांचा शोध घेणे, स्मार्ट ऊर्जा, हरित ऊर्जा उपक्रम, ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा, ग्रीड ट्रान्समिशन आणि वितरण आणि मीटरिंगवर यावेळी चर्चा झाली.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरएवढी होण्याच्या मार्गावर आहे. सीएम सोलार फीडर ॲग्री स्कीम आणि आरडीएसएससारख्या सरकारच्या योजना ऊर्जाक्षेत्रात मोठे परिवर्तन घडवतील, असे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंगचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.
डिजिटायझेशन, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत ऊर्जा यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. तंत्रज्ञान कार्यक्षमता वाढवून आणि खर्च कमी करून लाखो ग्राहकांना फायदा करून देऊ, असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीचे सीएमडी डॉ. संजीव कुमार म्हणाले. तर येत्या पाच वर्षांसाठी वीजनिर्मिती आणि वीजवितरणासाठी मोठी गुंतवणूक आम्ही करू, असे टाटा पॉवरचे अध्यक्ष संजय बंगा यांनी सांगितले. तर महाराष्ट्राचे ऊर्जाक्षेत्र हे राज्याच्या आर्थिक यशाचा आधारस्तंभ असून ते औद्योगिकीकरणाला चालना देणारे असल्याचेही इमाचे अध्यक्ष हमजा अर्सीवाला यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.