पावसाचा फटका मदत व पुनर्वसन मंत्र्यांना

पावसाचा फटका मदत व पुनर्वसन मंत्र्यांना

Published on

पावसाचा फटका मदत व पुनर्वसन मंत्र्यांना
व्हायरल व्हिडीओची रेल्वेकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला येणाऱ्या मंत्र्यांसह आमदारांना बसला आहे. स्वतः राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह दहा आमदार विदर्भ एक्स्प्रेसमधून अडकून होते. अनिल पाटील आणि काही आमदारांनी रेल्वे रुळांवरून चालत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर रेल्वेने तत्काळ या व्हिडीओची दखल घेत मंत्री आणि आमदारांना पुन्हा विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बसविण्याची विनंती केली. त्यानंतर ही एक्स्प्रेस दादर स्थानकांवर आणण्यात आली. त्यानंतर या सर्व आमदारांनी लोकलने दुपारी १२ वाजता सीएसएमटी स्थानक गाठले


दोन दिवसांची सुट्टी असल्याने बहुतांश आमदार आणि मंत्री हे आपापल्या गावी गेले होते. पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असल्याने सोमवारी सभागृहात वेळेत हजर राहण्यासाठी अनेक आमदार विदर्भ एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, लातूर एक्स्प्रेस या गाड्यांनी मुंबईत येत होते. मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस एका मागे एक खोळंबल्या. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसोबत आमदारांनादेखील सहन करावा लागला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह दहा आमदार विदर्भात एक्स्प्रेसमध्ये अडकले होते. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह काही आमदार अडकले होते; तर संजय बनसोडे हेही लातूर येथून येणाऱ्या ट्रेनमध्ये अकडले. अधिवेशनात जाण्यासाठी विलंब होत असल्याने अखेर मंत्री अनिल पाटील यांनी रेल्वे रुळांवरून चालत जात नजीकचे स्थानक गाठण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर आमदार अमोल मिटकरीसुद्धा होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.