प्रजापती बोधणे यांनी गिरिमित्र जीवनगौरव पुरस्कार

प्रजापती बोधणे यांनी गिरिमित्र जीवनगौरव पुरस्कार

Published on

प्रजापती बोधणे यांना गिरिमित्र जीवनगौरव पुरस्कार
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) : महाराष्ट्रातील तमाम डोंगरांची सफर करणाऱ्यांचे व्यासपीठ असलेल्या गिरिमित्र संमेलनातर्फे दिले जाणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक प्रजापती बोधणे यांना या संमेलनाचा गिरिमित्र जीवनगौरव जाहीर झाला आहे. मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ येथे १३ आणि १४ जुलै रोजी झालेल्या २१व्या गिरिमित्र संमेलनामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कैवल्य वर्मा आणि जितेंद्र गवारे यांना गिरिमित्र गिर्यारोहक सन्मानाने गौरवण्यात आले. मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर व गिरिकुजन, पुणे या दोन संस्थांना गिरिमित्र संस्था सन्मान जाहीर झाला आहे. तर दुर्ग संवर्धनामध्ये काम करणाऱ्या गडकरी परिवार या संस्थेस गिरिमित्र शरद ओवळेकर पुरस्कार जाहीर केला गेला आहे.
प्रजापती बोधणे यांनी ४५ वर्षांच्या गिर्यारोहण कारकीर्दीत सह्याद्री व हिमालयातील शिखरांच्या पाचशेच्या वर मोहिमा केल्या आहेत. तसेच, २७ वर्षे नौसेना व नेव्हल डॉकयार्डतर्फे गिर्यारोहण व साहसीतील अगणित मोहिमांतील २२५ हून अधिक बहुदिवसीय साहसी उपक्रमांचे आयोजनही त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.