पावसाचा बेस्टला फटका

पावसाचा बेस्टला फटका

Published on

‘बेस्ट’च्या २३ बसगाड्या अडकल्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बेस्ट वाहतुकीलाही बसला. अनेक भागांत पाणी तुंबल्याने २३ बसगाड्या अडकल्या, तर ४४ मार्ग वळवावे लागले. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पावसामुळे एलबीएस रोड, विनोबा भावे, दहिसर सबवे, गांधी मार्केट, अंधेरी सबवे, एस व्ही रोड, कुर्ला सिग्नल, वडाळा स्टेशन, बोरिवली पूर्व, गौतम नगर, शेल कॉलनी, संगम नगर, अंधेरी मार्केट अंबोली, चुनाभट्टी बस स्टँड आदी ठिकाणी पाणी तुंबले. यामुळे पहाटे साडेपाच वाजल्यापासून निघालेल्या बस अडकल्या. दिवसभरात सुमारे २३ बसगाड्या अडकल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. मुंबईतील अनेक भागांत पाणी तुंबल्याने बसगाड्यांचे मार्ग वळवावे लागले. बेस्टच्या वर्कमॅन सेवेसह दिवसभरात ४४ बसमार्ग इतर मार्गावरून वळवावे लागले. रेल्वे रूळांवर पाणी भरल्याने सकाळपासून रेल्वेचे तीनही मार्ग प्रभावीत झाले होते. यामुळे प्रवाशांनी बेस्ट बस सेवेकडे धाव घेतली. परिणामी बस स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.