जाब विचारल्याने महिलेवर वार

जाब विचारल्याने महिलेवर वार

Published on

ठाणे, ता. ८ (वार्ताहर)ः घराच्या प्रांगणात खेळणाऱ्या चिमुरडीला चापट मारल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या आईच्या डोक्यात वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात बापलेकावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड, गांधीनगर परिसरात घराच्या प्रांगणात खेळत असताना पियूष कनोजिया याने मुलीला चापट मारत हुसकावून लावले होते. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला शैलेश आणि पियूष या पिता-पुत्राने अज्ञात वस्तूने डोक्यावर वार करून जखमी केले. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात जंगबहादूर पांडे (३५) यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.