कैसर खालिद यांच्याविरोधात तक्रार

कैसर खालिद यांच्याविरोधात तक्रार

कैसर खालिद यांची एसीबीकडून चौकशी सुरू?

मुंबई, ता. ९ : एका खासगी तक्रारीवरून निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी सुरू केल्याचे समजते. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अलीकडेच खालिद यांना अनियमितता आणि प्रशासकीय त्रुटी सोडल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले होते. अंधेरीत राहणाऱ्या एका व्यक्तीने ७ मे रोजी राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडे लेखी तक्रार करत, खालिद यांनी रोख रक्कम स्वीकारली, त्यांची अमेरिका वारी प्रायोजित होती, असे आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही तक्रार पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी चौकशीसाठी एसीबीकडे पाठवली. त्यावर एसीबीने तक्रारदार आणि संबंधितांचे जाब-जबाब नोंदवण्यास सुरुवात केल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com