व्हिसासाठी घेतलेल्‍या ७९ लाखांचा अपहार

व्हिसासाठी घेतलेल्‍या ७९ लाखांचा अपहार

Published on

व्हिसासाठी घेतलेल्‍या ७९ लाखांचा अपहार
मालाडमधील प्रकरण; ट्रॅव्हल्‍स मालकाविरोधात गुन्हा
अंधेरी, ता. ९ (बातमीदार) ः व्हिसासाठी घेतलेल्या सुमारे ७९ लाख रुपयांचा अपहार करून बंगळुरूच्या एका महिला व्यावसायिकासह दोघांची सुमारे ७९ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. ॲसिल ट्रॅव्हेल्स कंपनीचा मालक दिव्येश पटेल याच्याविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
सुनायना जगननादम पेरुरी ही महिला मूळची बंगळुरूची रहिवासी आहे. ती युरोप, कॅनडा देशात जाणाऱ्या लोकांना व्हिसा देण्याचे काम करते. त्यासाठी तिला संबंधित ग्राहकांकडून लिगल फी म्हणून मानधन दिले जाते. नोव्हेंबर २०१९ मध्ये तिला एका खासगी वेबसाईटवर मालाडच्या लिंक रोड, काचपाडा, जयवंती अलाईड बिझनेस सेंटरची एक जाहिरात दिसली होती. या कंपनीचा दिव्येश पटेल हा मालक असून तोदेखील व्हिसाचे काम करत होता. तिने त्याला फोन करून त्याच्याकडे व्हिसाच्या कामाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने एका व्हिसामागे तो तीन लाख रुपये घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तिच्याकडे येणाऱ्या सर्व व्हिसाचे काम दिव्येशकडे देण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत आल्यानंतर तिने दिव्येशची भेट घेतली होती. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्यात व्हिसा कामाबाबत एक करार झाला होता.
२ मे २०२० ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत तिने ६२ लोकांचे व्हिसा बनवून देण्याचे काम दिव्येशला दिले होते. तिने त्याच्या बँक खात्यात ७८ हजार, १० हजार, तर त्याच्या सांगण्यावरून त्याच्या कंपनीतील कर्मचारी योगेश पटेल याच्या बँक खात्यात १४ लाख रुपये, असे ९२ लाख १० हजार ट्रान्स्फर केले होते. त्याने दिलेल्या व्हिसावर विदेशात गेलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते. व्हिसा रद्द करून त्याला पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते. दिव्येशने बोगस कागदपत्रे सादर करून व्हिसा मिळविल्याने या प्रवाशाला तीन वर्षांसाठी कॅनडामध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याने त्याच्याविरुद्ध तेथील लोकल कोर्टात एक केस फाईल केली होती.

मंजुरीविना मिळवला व्हिझीट व्हिसा
ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ या कालावधीत त्याने तीन लोकांचे कॅनडा देशाचे व्हिसा मंजुर झाल्याचे सांगितले. व्हिसाची कागदपत्रे आल्यानंतर तिला तो ‘व्हिसा वर्क’ नसून ‘व्हिझीट व्हिसा’ असल्याचे दिसून आले. मुळात व्हिझीट व्हिसा घेताना तिची परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र तशी कुठलीही मंजुरी न घेता त्याने व्हिझीट व्हिसा मिळविला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.