मुलुंडमधील महिलांना नावनोंदणीसाठी आवाहन

मुलुंडमधील महिलांना नावनोंदणीसाठी आवाहन

Published on

मुलुंडमधील महिलांना नावनोंदणीसाठी आवाहन

मुलुंड, ता. ९ (बातमीदार) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी मुलुंडमध्ये मयुरा बाणावली पुढे सरसावल्या आहेत. योजनेचा संबंधितांना लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर लाभार्थींना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व निराधार महिलांना मिळणार आहे. संबंधित योजनेचा फायदा घेण्यासाठी ३१ ऑगस्ट शेवटची तारीख असून अर्ज करताना कोणतीही समस्या जाणवत असेल, तर मुलुंड विकास समितीच्या अध्यक्षा मयुरा बाणावली यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महिलांना केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.