म्हाडाने स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन 
कक्षाची स्थापना करावी

म्हाडाने स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन कक्षाची स्थापना करावी

Published on

म्हाडाने स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन
कक्षाची स्थापना करावी
- मिळकत व्यवस्थापकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : म्हाडाच्या मुंबईत विविध ठिकाणी इमारती आणि मोकळे भूखंड आहेत. येथील अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने ते काम म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापकांवर टाकले आहे. आपले दैनंदिन काम करून अतिक्रमण निर्मूलन करताना संबंधित मिळकत व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे म्हाडाने मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर अतिक्रमण निर्मूलन कक्षाची स्थापना करून स्वतंत्र कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मिळकत व्यवस्थापकांनी म्हाडाच्या उपमुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
म्हाडाने २०१९ मध्ये ठराव क्रमांक ६८३३ नुसार स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन कक्ष कार्यन्वित होईपर्यंत सदरचे काम म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक आणि कार्यकारी अभियंता विभागातील उपअभियंता यांच्याकडे दिले आहे. त्यानुसार तांत्रिक ज्ञान नसतानाही मिळकत व्यवस्थापकांना आपले काम सांभाळून इमारतीमध्ये, गाळ्यात झालेले अनधिकृत बांधकाम काढण्याची जबाबदारी दिली आहे, तर उपअभियांत्यांवर रिकाम्या भूखंडावरील अतिक्रमण हटावण्याची जबाबदारी आहे. तात्पुरत्या स्वरूपात दिलेली ही जबाबदारी पाच वर्षांनंतरही कायम आहे. त्यामुळे मिळकत व्यवस्थापकांमध्ये नाराजी आहे. त्‍यामुळे त्‍यांनी स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन कक्षाची स्थापना करावी, या मागणीचे निवेदन म्हाडाच्या उपमुख्य अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, मिळकत व्यवस्थापक हे इमारतीमधील किंवा गाळ्यातील अतिक्रमण काढण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्याबाबतची त्यांना जाणही नाही. त्यामुळे हे काम त्यांना देऊ नये, अशीही मागणी त्यांच्याकडून होत आहे. याबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.