आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक

आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक

Published on

आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मंगळवारी (ता. ९) महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी अधिकारी वर्गाची बैठक घेतली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी अधिकारीवर्गाला दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त-१ प्रल्हाद रोडे, अतिरिक्त आयुक्त -२ तथा नोडल अधिकारी आपत्ती व्यवस्थापन धैर्यशील जाधव, शहर अभियंता अनिता परदेशी आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्टीग्रेटेड कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटरमध्ये मुख्य‍ नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत इन्टीग्रेटेड कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर हे महत्त्वाचे मुख्य नियंत्रण केंद्र राहील. यात महापालिका अधिकारीवर्गाच्या नियंत्रणाखाली एक पथक स्थापन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.