ठाण्यात पाण्यासाठी बोंबाबोब

ठाण्यात पाण्यासाठी बोंबाबोब

Published on

ठाण्यात पाण्यासाठी बोंबाबोंब
जलवाहिनीला गळती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : अतिवृष्टीमुळे आधीच पिसे आणि स्टेम पंपिंग स्टेशनमध्ये नदीपात्रातून वाहून आलेला गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा गाळ काढण्याच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ठाणे पालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर माजिवडादरम्यान मुख्य जलवाहिनीला गळती सुरू झाली आहे. त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावरदेखील होणार आहे. त्यामुळे ठाण्यात पाण्यासाठी पुन्हा बोंबाबोंब होणार असल्याचे दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात व धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यात भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन, तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचा परिणाम ठाणे महापालिका क्षेत्रात ९ जुलैपासून होताना दिसत आहे, तसेच पालिकेच्या माध्यमातून येथील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम आता अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा अनियमित
११ जुलैपर्यंत म्हणजेच गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा अनियमित होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच बुधवारी (ता. १०) सकाळी ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीत टेमघर - माजिवडादरम्यान गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था बंद करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने सांगितले, परंतु ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.