रागाच्या भरात वयोवृध्द आईची हत्या

रागाच्या भरात वयोवृध्द आईची हत्या

Published on

रागाच्या भरात वयोवृद्ध आईची हत्या

मुंबई, ता. १० : झोपमोड झाल्याच्या कारणावरून एका वृद्धाने रागाच्या भरात आपल्या वयोवृद्ध आईची हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (डीबी मार्ग) येथील पंडीतालय इमारतीत घडली. रमाबाई पिसाळ (वय ७८) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरोपीने हत्येनंतर शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकाला आपल्या आईचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दाखवला. नातेवाईकाने पोलिसांना या घटनेची माहिती देताच डी. बी. मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रमाबाई पिसाळ यांना जे. जे. रुग्णालयात आणले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष वाघ (वय ६४) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेला लोखंडी सुराही जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमाबाई आणि सुभाष गेल्या अनेक वर्षांपासून पंडीतालय इमारतीत राहतात. या इमारतीत पहाटे पाणी येते. पाणी भरण्यासाठी पहाटे उठावे लागते म्हणून सुभाष रात्री लवकर झोपत होता, मात्र त्याच वेळेस रमाबाई धुणी, भांडी करत होत्या. यामुळे सुभाषची झोपमोड होत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. मंगळवारी सकाळीही याच मुद्यावरून दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात सुभाषने रमाबाई यांच्या पोटात लोखंडी सुरा खुपसला. राग शांत होईपर्यंत त्याने रमाबाई यांच्यावर सात ते आठ वार केले.

रमाबाई यांचाही प्रतिकार
मृत रमाबाई यांनीही सुभाषचा बराच प्रतिकार केला असावा, असा अंदाज त्यांच्या शरीरावरील अन्य जखमा, व्रण पाहून पोलिसांनी व्यक्त केला आहे. रमाबाई गृहिणी होत्या, तर सुभाष याच्या मालकीचे परिसरात दुकान आहे. ते त्याने भाड्याने दिले आहे. त्यातूनच या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. सुभाष हा रमाबाई यांना पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.