भोंदू बाबाने विवाहितेवर केला लैंगिक अत्याचार

भोंदू बाबाने विवाहितेवर केला लैंगिक अत्याचार

Published on

भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार
आरोपीवर गुन्हा दाखल; दागिने घेऊन फरार
पनवेल, ता. १० (वार्ताहर) : कौटुंबिक अडचणींवर उपाय करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने ४१ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. मौलाना बाबा नुरी सय्यद (वय ३०, रा. गुजरात) असे भोंदूबाबाचे नाव आहे. या महिलेचे दागिने घेऊन त्याने पलायन केले आहे. त्याच्याविरोधात तळोजा पोलिसांनी बलात्कारासह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला तळोजा भागात कुटुंबासह राहते. दोन वर्षांपासून ती कौटुंबिक अडचणींनी त्रस्त होती. ऑक्टोबर २०२२मध्ये या महिलेने सोशल मीडियावर जाहिरात पाहिली. त्यावरून तिने या बाबाला संपर्क साधल्यानंतर त्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर तो या महिलेच्या घरी पोहोचला. त्याने उपायांचा भाग म्हणून महिलेला शारीरिक संबंधास भाग पाडले. त्यानंतर तिचे अश्‍लील फोटो व व्हिडीओदेखील काढले. ते व्हायरल करून तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिला पनवेल येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. तसेच, या बाबाने तिच्याकडून सहा तोळ्यांचे दागिनेही घेतले होते. अखेर त्याचा त्रास वाढल्याने या महिलेने पतीला माहिती दिली. त्यानंतर दोघांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपी बाबाचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.