पीएम सूर्यघर योजनेतून उजळणार उपराजधानी

पीएम सूर्यघर योजनेतून उजळणार उपराजधानी

पीएम सूर्यघर योजनेतून उजळणार उपराजधानी
नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक २५ हजार अर्ज; २६३ मेगावॉटची क्षमता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेंतर्गत राज्याची उपराजधानी नागपूर उजळून निघणार आहे. केंद्र सरकारच्या मोफत सूर्यघर योजनेसाठी राज्यभरातून तब्बल एक लाख ४५ हजार अर्ज पोर्टलवर करण्यात आले आहेत. त्यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यातून २५ हजार ३३ अर्ज आले असून या सर्व अर्जदारांची एकूण मिळून २६३ मेगावाॅट क्षमता आहे. त्यामुळे संबंधित घरगुती वीजग्राहकांची घरे उजळून निघणार आहेत.

सर्वसामान्यांच्या डोक्यावर पडणारा वीजबिलाचा भार हलका करण्यासाठी केंद्र सरकारने सूर्यघर मोफत योजना जाहीर केली आहे. त्यानुसार घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी ४० टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार या योजनेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. राज्याचा विचार करता नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक २५ हजारांहून अधिक अर्ज आले असून त्याखालोखाल पुणे जिल्ह्यातून १७ अर्ज आले असून त्यांची एकूण वीज निर्मिती क्षमता ४२२ मेगावाॅट असणार आहे. त्यामुळे राज्यात सूर्यघर योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.


..
पुण्याची स्थापित क्षमता जास्त
सूर्यघर मोफत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत नागपूर जिल्हा आघाडीवर असला तरी स्थापित वीज निर्मिती क्षमतेत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. नागपूरची एकूण वीज निर्मिती क्षमता २६३ मेगावाॅट आहे, तर पुण्यातून कमी अर्ज आले असले तरी त्यांची स्थापित क्षमता ४२२ मेगावाॅट असणार आहे. नाशिक जिल्ह्याची स्थापित क्षमता १४२ मेगावाॅट, तर संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या अर्जाचा विचार करता १३८ मेगावाॅट एवढी क्षमता आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याती शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com