वाहतूक पोलिसांकडून खड्ड्यांची डागडुजी

वाहतूक पोलिसांकडून खड्ड्यांची डागडुजी

Published on

वाहतूक पोलिसांकडून खड्ड्यांची डागडुजी
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमुळे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. मानखुर्द टी जंक्‍शन येथे सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्‍य पसरले आहे. रस्‍त्‍याच्या दयनीय अवस्‍थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना वाहतूक पोलिसांनी येथील खड्डे बुजवून वाहनचालकांना दिलासा दिला. मानखुर्द टी जंक्शन सायन-पनवेल महामार्गावर पडलेल्‍या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघाताची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.