पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

Published on

बोईसर, ता. ११ (बातमीदार) : पत्नीचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने घरातील सर्व कामकाज आपल्यालाच करावे लागत असल्याने संतापलेल्या पतीने चाकूच्या साह्याने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केल्याचा प्रकार केळवा रोड येथील देवीचा पाडा येथे घडला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

सुमन बुद्धिराम कनोजीया (वय २९, रा. देवीचापाडा केळवा रोड, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमन आणि तिचा पती बुद्धिराम कनोजिया हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून केळवा परिसरात भाडेतत्त्वावर राहत होते. सुमनचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याने घरातील कामकाज तिच्याकडून वेळेत होत नसल्याने त्याचा सर्व भार बुद्धिराम याच्यावर पडत होता. दिवसेंदिवस घरगुती कामाचा व्याप आपल्यावर पडत असल्याने संतापलेल्या बुद्धिराम याने ३ जुलै रोजी धारदार चाकूने पत्नीचा गळा चिरून हत्या केली होती. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सफाळे पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांदळे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.