सार्वजनिक स्वच्छतागृहावर अनधिकृत मोबाईल टॉवर

सार्वजनिक स्वच्छतागृहावर अनधिकृत मोबाईल टॉवर

Published on

कळवा, ता. ११ (बातमीदार) : ठाणे महापालिका क्षेत्रात उंच इमारतीवर सध्या विविध मोबाईल कंपन्यांचे बेकायदा मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत; मात्र त्यावर सध्या कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत न्यायालयात जागृत नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे, असे असताना आता कळव्यातील सायबानगर परिसरातील झोपडपट्टीतील एका स्वच्छतागृहावर एका खासगी ठेकेदाराने मोबाईल टॉवर उभारला आहे.

महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारला आहे. यातून मिळणारे भाडे महापालिकेच्या तिजोरीत तर जात नाही, मग खासगी ठेकेदार नक्की कोणासाठी वसूल करतो? याकडे येथील नागरिकांनी लक्ष वेधले आहे. स्वच्छतागृह नाल्याच्या बाजूला असल्याने वर्षभर येथे ओलावा असतो, तसेच पावसामुळे भिंती ओल्या होतात. या स्वच्छतागृहावरून या टॉवरसाठी वायरची जोडणी केली आहे. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.