प्रियदर्शनी क्रीडा संकुलावर मनसेचा मोर्चा

प्रियदर्शनी क्रीडा संकुलावर मनसेचा मोर्चा

प्रियदर्शनी क्रीडा संकुलावर मनसेचा मोर्चा
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः मुलुंडच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात गुरुवारी (ता. ११) मनसेने संकुलात घुसून आंदोलन केले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले.
या क्रीडा संकुलाची परिस्थिती पाहता हे महानगरपालिकेने कुणासाठी सुरू केले आहे, असा प्रश्‍न आंदोलकानी विचारला. या ठिकाणी विविध सोई-सुविधांसाठी आकारली जाणारी फी सामान्य नागरिकांना परवडणारी नाही, त्यातूनच वारंवार या ठिकाणी दुरुस्ती केली जाते. मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली तरण तलावाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. दुरुस्ती केली की पुन्हा तरण तलाव काही ना काही कारणास्तव बंद करण्यात येते, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
विशेष म्हणजे, सभागृह अद्ययावत करणे, खेळाडू आणि कलाकार घडवणे, यासाठी कोणताही पुढाकार प्रशासनातर्फे घेतला जात नाही. मात्र, या ठिकाणच्या सुविधांसाठी अधिक पैसे आकारले जातात. त्‍यामुळे या विषयावर मनसे आक्रमक झाली आहे. याबाबतच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी मनसेचे मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत. त्‍यामुळे चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास मनसेस्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
या वेळी मनसे मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्यासह राजेंद्र देशमुख, शशांक माईणकर, संदीप कदम, लक्ष्मी सोनवणे, वंदना पाटील, सोनाली राकेश, विमल लोखंडे, दादा देठे, सुनील सावंत, देवेंद्र वैती, संदीप वरे, राजेश पांचाळ व मनसेचे महिला, पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com