होर्डिंगवरील कारवाईमुळे अधिकाऱ्याला मारहाण

होर्डिंगवरील कारवाईमुळे अधिकाऱ्याला मारहाण

Published on

अंबरनाथ, ता. ११ (बातमीदार)ः होर्डिंगवरील कारवाईदरम्यान अंबरनाथ नगरपालिकेतील भांडार विभागप्रमुख सचिन गायकवाड यांना मारहाण झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत नगरपालिकेचे कामकाज काही काळासाठी बंद केले होते.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगवर कारवाईची मोहीम अंबरनाथ नगरपालिकेकडून राबवण्यात येत आहे. याच कारवाईचा जाब विचारण्यासाठी पालिकेच्या भांडार विभागात आलेल्या प्रवीण गोसावी याची भांडार विभागप्रमुख सचिन गायकवाड यांच्याशी बाचाबाची झाली होती. या वेळी प्रवीण गोसावीने सचिन गायकवाड यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर जमा होत दिवसभर ‘काम बंद’ आंदोलन केले. या घटनेनंतर अंबरनाथ पोलिस स्टेशनमध्ये प्रवीण गोसावीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रार करूनही पालिकेतील अधिकारी अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला विलंब करत होते. याबाबतचा जाब विचारताना झालेल्या वादावादीवेळी सचिन गायकवाड अंगावर धावून आल्याने प्रतिकार केल्याचे गोसावी यांनी सांगितले. तसेच याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असे गोसावी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.