शासकीय योजनांचा कुष्ठरुग्णांनी लाभ

शासकीय योजनांचा कुष्ठरुग्णांनी लाभ

Published on

मुंबई : कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन, नोकरीत संधी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा वर्षभरात राज्यातील १०,७८५ कुष्ठरुग्णांनी लाभ घेतला आहे. राज्यातील कुष्ठरुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ व्हावे, यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमागोथू नायक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा आवास योजना, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व आर्थिक विकास महामंडळ, बँक लोन, अपंग व्यक्तीसाठी बीज भांडवल, आर्थिक सहाय्य व स्वयंरोजगार आदी शासकीय योजनांच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन योजनांचा १० हजार ७८५ कुष्ठरुग्णांनी लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com