अस्वाली धरण क्षेत्रात बुडून तरुणाचा मृत्यू
बोर्डी (बातमीदार) : अस्वाली धरणाच्या सांडव्याच्या पाण्याच्या प्रवाहात पाय घसरून पडल्याने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर सोमवारी (ता. २६) रात्री उशिरा झाई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बोरीगावातील गोदर पाडा येथील मार्मिक महेश कोळी हा त्याच्या मित्रांसोबत रविवारी (ता. २५) दुपारी अस्वाली धरणावर गेला होता. संध्याकाळी तो घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी रात्री उशिरा घोलवड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी सोमवारी (ता. २६) सकाळपासून शोधमोहीम हाती घेतली. धरणाच्या उत्तरेला पाणी उलटून जाणाऱ्या धोकादायक भागात रविवारी पोहत असताना तो कड्यावरून खाली आपटला आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह गावठणपाडा भागातील नदीपात्रात आढळून आला. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. घरातील कमावत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

