

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बेकायदा फलकबाजी
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : भाईदर ते काशी मिरा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच शहरात विविध ठिकाणी आयोजित दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी शहरात आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी महापालिकेने आखून दिलेल्या नियमांना केराची टोपली दाखवत राजकीय नेत्यांकडून बेकायदा फलकबाजी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातील या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या हटकेश उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री शहरात येणार असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती. त्याचाच एक भाग म्हणून लोकार्पण होत असलेल्या उड्डाणपुलावरील विजेच्या खांबांवर बेकायदा फलकबाजी करण्यात आली. वास्तविक शहर विद्रूप होऊ नये यासाठी पथदिवे, वृक्ष, भिंती, बस थांबे व अन्य सार्वजनिक ठिकाणी कोणतेही फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ महापालिकेने परवानगी दिलेल्या जाहिरात होर्डिंगवरच फलक लावण्यास परवानगी आहे. असे असतानाही महापालिकेचा नियम डावलून राजकीय नेत्यांनी प्रसिद्धी मिळविण्यासाठी ही बेकायदा फलकबाजी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.