दहीहंडी न फोडण्याचा ठाकरे गटाचा निर्णय

दहीहंडी न फोडण्याचा ठाकरे गटाचा निर्णय

Published on

पालघर, ता. २७ (बातमीदार) : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने पालघर येथील ठाकरे गटाने या घटनेच्या निषेध नोंदवला. या वर्षी शहरातील हंडी न फोडण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी निषेध करून सरकारविरोधात घोषणा दिल्या.

पालघर शहरात अनेक वर्षांपासून दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे. पालघरमधील सुमारे ४० ते ४५ हंडी फोडण्याच्या परंपरेला यावर्षी छेद देण्यात आला. फक्त पालघर येथील मानाची लक्ष्मीनारायण मंदिराची दहीहंडी फोडून अन्य दहीहंडी न फोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे यावर्षी पालघर शहरात हौसेने हंडी लावणाऱ्यांचा हिरमोड झाला.

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराजांचा पुतळा उभारला, तर त्याचा फायदा होईल, या हेतूने त्याचे उद्‍घाटन करण्यात आले. ब्रांझचा पुतळा तयार करायचा असेल तर त्याला तीन वर्षे लागतात, मात्र हा पुतळा सहा महिन्यात बनवण्यात आला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. मात्र घाईघाईत उद्‍घाटन करून घेतल्याने हा प्रसंग ओढवला, असा दावा जिल्हाप्रमुख अजय ठाकूर यांनी केला. याप्रसंगी सुनील महेंद्रकर, यतीन उलकंदे, सिद्धेश घरत, जश्र्विन घरत, कृतार्थ पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com