

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : घराघरात वीज पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणची तब्बल ११२ कोटींची विद्युत उपकरणे गहाळ झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. त्याची गंभीर दखल घेत गोदामातील उपकरणांचा छडा लागला नसल्याने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली महावितरणने सुरू केल्या आहेत.
महावितरणची राज्यात चार विभागीय कार्यालये आणि १६ परिमंडळ कार्यालये आहेत. वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास तो तत्काळ दुरुस्त करता यावा म्हणून महावितरण आपल्या विभागीय कार्यालयांना पुरेशी तांत्रिक उपकरणे आणि अन्य साहित्य उपलब्ध करून देते. स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या उपकरणांची नोंद ‘सॅप’ प्रणालीत ठेवली जाते. तरीदेखील वर्षभरात ११२ कोटींची साधनसामग्री गायब असल्याची गंभीर बाब महावितरणच्या एका गोपनीय पत्रावरून चव्हाट्यावर आली होती. याप्रकरणी महावितरणने अंर्तगत ऑडिट करताना गहाळ मालमत्तेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतरही सामग्री गहाळ असल्याची माहिती समोर आल्याने जबाबदारी असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महावितरणचे वित्त संचालक अनुदीप दिघे यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.