हातापायांना दुखापत, रुग्णालयांमध्ये उपचार सुरु

हातापायांना दुखापत, रुग्णालयांमध्ये उपचार सुरु

Published on

दहीहंडीच्या थरारात ४१ गोविंदा जखमी
विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : दहीहंडी फोडण्याच्या उत्साहात थरावर उभे राहिलेले अनेक गोविंदा या वर्षीही जखमी झाले आहेत. पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४१ गोविंदा जखमी झाल्याची नोंद आहे.
पालिकेच्या केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी गोविंदांपैकी एकाच्या खांद्याला मार बसला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे ऑर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. दोघांना ऑर्थोपेडिक विभागासाठी दाखल केले होते. सोमवारी सरावादरम्यान एक गोविंदाला मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने केईएममध्ये दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या बऱ्याचशा गोविंदांना हातापायाला खरचटले आहे. दरम्यान, ८ गोविंदांना पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अॅडमिट करावे लागले आहे. २६ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार केले गेले. ७ गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
...
रुग्णालयांनुसार दाखल गोविंदा
सेंट जॉर्ज- २ पैकी एक अॅडमीट. दुसऱ्यावर ओपीडीत उपचार सुरू
जी. टी. रुग्णालय - १ अॅडमीट
पोद्दार- ६ गोविंदांवर तत्काळ उपचार करून डिस्चार्ज दिला
केईएम ८ पैकी एकाला दाखल केले. ७ जणांवर ओपीडीत उपचार
नायर रुग्णालय - ५ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार
सायन -३ गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार
राजावाडी रुग्णालय - ३ जण अॅडमिट
एमटी अग्रवाल - १ अॅडमिट
कुर्ला भाभा रुग्णालय- एकाला दाखल केले; दुसऱ्याला ओपीडीत उपचार
शताब्दी गोवंडी रुग्णालय - दोघांवर ओपीडीत उपचार
वांद्रे भाभा रुग्णालय - तिघांवर ओपीडीत उपचार
कांदिवली शताब्दी- एकावर ओपीडीत उपचार
ट्रॉमा केअर- एकावर उपचार करून डिस्चार्ज, दुसऱ्यावर ओपीडीमध्ये उपचार
व्ही. एन. देसाई - दोघांवर ओपीडीत उपचार
...
जे. जे. रुग्णालयात एकावर उपचार
एका ३० वर्षीय गोविंदांवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो थरावरून पडल्याने त्याच्या तोंडावर आघात झाला आहे. सध्या उपचाराधीन असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com