बदलापुरात चौकाचौकात शुकशुकाट!
बदलापूर (बातमीदार) : शहरात शिशूवर्गातील दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारामुळे विविध राजकीय पक्ष, तसेच सामाजिक संस्था यांनी आज (ता. २७) दहीहंडी उत्सव रद्द केला. बदलापूर साऊंड असोसिएशननेदेखील या घटनेच्या निषेधार्थ सर्व ऑर्डर्स रद्द करून डीजे न वाजवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सांस्कृतिक शहराची परंपरा असलेल्या या बदलापूर शहरात सगळीकडेच शुकशुकाट पाहायला मिळाला.
गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या वतीने महत्त्वाच्या चौकाचौकात दहीहंड्यांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून हजारो रुपयांची बक्षिसेदेखील वाटली जातात. त्यात आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुका पाहता आयोजकांसह गोविंदांमध्ये मोठा उत्साह होता, मात्र सणासुदीच्या तोंडावर शहरात घडलेल्या संतापजनक घटनेमुळे बदलापुरातील संवेदनशील राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला. त्यामुळे महत्त्वपूर्ण रस्त्यांवर, दहीहंडीच्या दिवशीही शुकशुकाट पाहायला मिळत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

