

कळवा (बातमीदार) : कळवा, खारेगावमध्ये ठिकठिकाणी दहीहंडीचा जल्लोष साजरा करण्यात आला. खारेगाव, पारसिकनगर, कळवा पूर्व घोळाईनगर, शिवाजीनगर आदी ठिकाणी तीन ते चार थराच्या दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या, तर कळवा नाका येथे श्रीकांत शिंदे सामाजिक मंचच्या वतीने दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. या दहीहंडीसाठी ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथील अनेक गोविंदा पथकांनी सलामीसाठी हजेरी लावली होती. दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने गोविंदांमध्ये निरुत्साह दिसून आला, मात्र संध्याकाळी पावसाने उसंत घेतल्याने गोविंदांमध्ये उत्साह संचारला. कळवा नाका येथे दहीहंडी फोडण्यासाठी व सलामी देण्यासाठी ४७ गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. ठाणे विठ्ठल गोविंदा पथकाने व शिवएकता मित्र मंडळ, खारेगाव यांनी सातव्या थरावर सलामी दिली.
दहीहंडी रद्द
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सचिव नजीब मुल्ला यांच्या वतीने कळवा परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार होता, मात्र ही हंडी अचानक रद्द करण्यात आली, मात्र सातव्या थरावर सलामी लावणाऱ्या गोविंदा पथकाला श्रीकांत शिंदे सामाजिक मंचच्या स्टेजवरून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.