गावागावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी सांस्कृतिक सभागृह
गावागावांमध्ये अहिल्यादेवी सांस्कृतिक सभागृहे
पहिल्या टप्प्यात १५ गावांतील सभागृहांना मिळाली मंजुरी
मुंबई, ता. २६ ः राज्यातील गावांमध्ये धनगर समाजाच्या विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आदी कार्यक्रमांसाठी आपल्या हक्कांचे सांस्कृतिक सभागृह उपलब्ध होणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ ६१ सांस्कृतिक सभागृहे स्थापन केली जाणार आहेत. या सभागृहांपैकी १५ ठिकाणच्या सभागृहांना ग्रामविकास विभागाने मंजुरी देत त्यासाठी निधीची तरतूद केली आहे.
२०१८-१९ या आर्थिक वर्षात ६१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातील १७ ठिकाणी कामे सुरू होऊ शकली नसल्याने ती तुर्तास वगळून उर्वरित ५० सर्व ठिकाणच्या सभागृहांच्या बांधकामासाठी मान्यता देण्यात आली आहे. नगर, जालना, नंदूरबार, यवतमाळ, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि कोल्हापूर जिल्ह्यात दोन, चंद्रपूर जिल्ह्यात तीन आणि नांदेड जिल्ह्यात चार अशा एकूण १५ जिल्ह्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हे सांस्कृतिक सभागृह उभे राहणार आहे. यासाठी एकूण १५ कोटी रूपयांची रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राज्यातील गावागावांमध्ये धनगर समाजाला आपल्या हक्कांची सांस्कृतिक सभागृह उभी राहावीत यासाठी धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. ग्राम विकास विभागाकडून १५ गावांतील सांस्कृतिक सभागृहाला मंजुरी देत त्यासाठीचा जीआर जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित सभागृहांसाठीही लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याने राज्यातील ५० गावांमध्ये धनगर समाजाला आपल्या हक्कांची सांस्कृतिक सभागृहे मिळणार आहेत. या निर्णयाचे धनगर समाज संघर्ष समितीने स्वागत केले आहे.
--
कोट
राज्यात उभारण्यात येत असलेल्या या सभागृहांमुळे अहिल्यादेवींचे विचार आणि कार्य गावागावांत पोहोचतील. या सभागृहाचा वापर समाजोपयोगी उपक्रमांसाठी करता येईल. ही सभागृहे उभी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे योगदान महत्त्वाचे राहिले.
- डॉ. विकास महात्मे, अध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समिती
--
कोट
पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या सततच्या प्रयत्नामुळेच यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना स्वयं योजना मिळाल्या. याशिवाय मेंढपाळ बांधवांच्या अनेक योजना लागू करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक सभागृह मिळत आहे.
- आनंद बनसोडे, प्रदेशाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

