बेस्टने सुमारे ९८ बसमार्ग दहिहंडी उत्सवामुळे वळविले
दहीहंडीमुळे बेस्टने ९८ बसमार्ग वळविले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबईत व उपनगरांत दहीहंडी उत्सव ठिकठिकाणी आयोजित केला होता. त्यामुळे बेस्टने सुमारे ९८ बसमार्ग अन्यत्र वळविल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली होती.
दादर एम. सी. जावळे मार्गावरील दहीहंडी उत्सवामुळे बसमार्ग क्रमांक ११८ चे प्रवर्तन सकाळी ६.१५ वा. पासून कबूतर खाना येथे खंडित करण्यात आले होते. विक्रोळी टागोरनगर पोस्ट ऑफिस येथील दहीहंडीमुळे बस मार्ग क्रमांक ४५३, १८५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मार्गे सायंकाळी ५.३० वाजल्यापासून वळविण्यात आले होते. दहीहंडीमुळे बसमार्ग क्रमांक २८७ व ६२९ चे प्रवर्तन ठाकूर सिनेमा येथे सायंकाळी खंडित करण्यात आले होते. जरी मरी मार्गावरील दहीहंडीमुळे बसमार्ग क्रमांक ३७५, ५०५, ४७३, ३७४ हे बसमार्ग टर्नर रोड, भाभा हॉस्पिटल मार्गे वळविण्यात आले होते. शिवाजीनगर बाजीप्रभू देशपांडे मार्गावरील दहीहंडीमुळे बसमार्ग क्रमांक ८ व ३७९ हे मार्ग सकाळपासून शिवाजीनगर आगारातून वळविण्यात आले होते. भांडुप येथील नरदासनगर येथील दहीहंडीमुळे बसमार्ग क्रमांक ६०५ वळविण्यात आले होते. वैभव चौक येथे हा मार्ग खंडित करण्यात आला होता. एस. एस. राव मार्गावरील गोपाळ नाईक चौक येथे दहीहंडी असल्यामुळे बसमार्ग क्रमांक २१७ चे विद्यमान मिंट कॉलनी येथील गांधी रुग्णालय येथे खंडित करण्यात आला होता. भांडुप गाव रस्त्यावर दहीहंडी बांधल्यामुळे बसमार्ग ३०७ च्या बस हिरानगर ते भांडुप पोलिस स्टेशनदरम्यान भांडुप सोनापूर, शास्त्री मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे बेस्टच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र, दहीहंडीच्या उत्सवात मोठ्या लोक सहभागी झाल्यामुळे बेस्टच्या गाड्यांमध्ये प्रवासीसंख्याही कमी असल्याचे बेस्टने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

