

आम्ही पापाची हंडी फोडली ः फडणवीस
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ ः अडीच वर्षांपूर्वी आम्ही पापाची हंडी फोडली. आता २०२४च्या विधानसभा निवडणुकीची दहीहंडी आम्हीच फोडणार, असे उद्गार काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या सुरात सूर मिसळला. ठाणे येथे आयोजित विविध दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.
भगवान श्रीकृष्णाची ही दहीहंडी आहे. त्यामध्ये प्रेमाचा काला असतो. त्यामुळे हंडी कुणीही फोडली, तरी तो काला सर्वांनी चाखायचा असतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेल्या रघुनाथनगर येथील दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ फाटक यांनी उभारलेल्या महिला सन्मानाच्या हंडीचे त्यांनी यावेळी कौतुकही केले. दरम्यान त्यांनी टेंभीनाका येथेही त्यांनी उपस्थिती लावली. आनंद दिघे यांनी निर्माण केलेला जोश पाहायचा असेल, तर धर्मवीर-२ मध्ये दिसेल, असेही ते म्हणाले. यानंतर त्यांनी भाजपचे कृष्णा पाटील यांनी गोकुळनगर येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावून गोविंदाचा उत्साह वाढवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.