

कल्याणमध्ये औषध विक्री दुकानात चोरी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडीमधील औषध दुकानात एका चोरट्याने शनिवार (ता. २४) मध्यरात्री चोरी केली आहे. याप्रकरणी दुकानाचा सुरक्षा रक्षक चेतन भारंबे (वय ३९) यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळसेवाडीमध्ये शिंदे आणि त्यांचे नातेवाईकांचे औषध विक्रीचे दुकान आहे. सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत दुकान सुरू असते. शनिवारी रात्री दुकानातील कर्मचाऱ्यांनी दुकान बंद केले, मात्र दुकानाचा सुरक्षा रक्षक काही कारणास्तव त्या दिवशी रात्रपाळीसाठी दुकानावर सुरक्षा ठेवण्यासाठी आला नव्हता. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने दुकानाचे शटर धारदार लोखंडी कटावणीने उघडले आणि ११ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.