

दहीहंडीच्या थरारात ६३ गोविंदा जखमी
विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईत दहीहंडी फोडण्याच्या उत्साहात थरावर उभे राहिलेले अनेक गोविंदा या वर्षीही जखमी झाले आहेत. पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ६३ गोविंदा जखमी झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आठ रुग्णालयांत ३२ उपचाराधीन होते, तर २३ जणांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
पालिकेच्या केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी गोविंदांपैकी एकाच्या खांद्याला मार बसला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे ऑर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. दोघांना ऑर्थोपेडिक विभागासाठी दाखल केले होते. सोमवारी सरावादरम्यान एका गोविंदाला मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने केईएममध्ये दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या बऱ्याचशा गोविंदांना हातापायाला खरचटले आहे. दरम्यान, ६३ गोविंदांना पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अॅडमिट करावे लागले आहे. ३२ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार केले गेले. २३ गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
...
एक गोविंदा ‘लीलावती’त
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी म्हणाले, ‘‘वाकोला येथील गोविंदा पथकातील ३४ वर्षीय गोविंदाला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या सहकारी गोविंदांनी आम्हाला माहिती दिली. तो उंचावरून पडला, बेशुद्धावस्थेत आणि चालता येत नसल्याबद्दल खुद्द गोविंदानेही पुष्टी केली. त्याला मणक्याला दुखापत झाल्याचे आढळून आले. त्याचे पाय सुन्न झाले आहेत. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
...
रुग्णालयांनुसार दाखल गोविंदा
सेंट जॉर्ज- ३ पैकी एक अॅडमीट. दुसऱ्यावर ओपीडीत उपचार सुरू, १ डिस्चार्ज
जी. टी. रुग्णालय - १ डिस्चार्ज
पोद्दार- ६ गोविंदांवर तत्काळ उपचार करून डिस्चार्ज दिला
केईएम ८ पैकी एकाला दाखल केले. ७ जणांवर ओपीडीत उपचार
नायर रुग्णालय - ५ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार
सायन -३ गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार
राजावाडी रुग्णालय - २ जण अॅडमिट, १ डिस्चार्ज
वीर सावरकर- १ डिस्चार्ज
एमटी अग्रवाल - १ अॅडमिट
कुर्ला भाभा रुग्णालय- १ अॅडमिट, १ डिस्चार्ज
शताब्दी गोवंडी रुग्णालय - ६ डिस्चार्ज
वांद्रे भाभा रुग्णालय - तिघांवर ओपीडीत उपचार
कांदिवली शताब्दी- १ अॅडमिट, ७ जणांवर ओपीडीत उपचार
ट्रॉमा केअर- ४ डिस्चार्ज
व्ही. एन. देसाई - तिघांवर ओपीडीत उपचार
एम. डब्ल्यू.- १ डिस्चार्ज
लिलावती - १ अॅडमिट
जेजे रुग्णालय - १ डिस्चार्ज
...
केईएममध्ये दोन गंभीर गोविंदा
केईएममध्ये २५ वर्षीय मनू खारवी याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तो सध्या बेशुद्ध अवस्थेत असून न्यूरो सर्जरी लागण्याची शक्यता आहे. कुणाल पाटील या २० वर्षीय मुलाला पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली असून न्यूरो डेफिसिटची शक्यता आहे. शिवाय नायर रुग्णालयात एक गंभीर रुग्ण असून ट्रॉमा रुग्णालयात एक रुग्ण दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.