

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : इराकमधील एका मुलीला जन्मत:च चेहऱ्याच्या डाव्या बाजूला रक्तवहिन्यासंबंधी दुर्मिळ अशी आजार होता. या आजारामुळे होणाऱ्या रक्तस्रावातून संसर्ग झाल्याने मुलीवर वेळीच उपचार होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र, इराकमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे उपचारासाठी भारतात येणे अतिशय अवघड असतानाही १३ वर्षांच्या मुलीसाठी तिच्या वडिलांनी सर्व आव्हानांवर मात करत इराक ते मुंबई असा प्रवास केला.
कोविड-१९ महामारीत रायमसला चेहऱ्याचा अर्धांगवायू झाला होता. तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे मुलीच्या प्रकृतीचा विचार करून मे २०२४ मध्ये युद्धजन्य परिस्थिती असतानाही तिच्या वडिलांनी इराकमधील धोकादायक परिस्थितीला तोंड देत तिला सुरक्षितरीत्या भारतात आणले. डॉ. सातभाई यांनी ३० मे रोजी क्रॉस फेशियल नर्व्ह ग्राफ्टिंगचा समावेश असलेल्या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण केला. त्यानंतर, रायमसला अवघ्या तीन दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, यापुढच्या सर्व शस्त्रक्रिया २०२५ मध्ये केल्या जाणार आहेत. एप्रिल २०२५ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रियेपूर्वी मज्जातंतू बरे होण्यासाठी ८ ते १० महिने वाट पाहणार आहोत. तिच्या मांडीतील स्नायू तिच्या चेहऱ्यात प्रत्यारोपित केले जाणार असून यामुळे शारीरिक हालचाल तसेच बांधेसूद शरीररचना राखता येणार आहे.
--------------------------------------------------
भारत आशेचा किरण
परळच्या ग्लेनईगल्स रुग्णालयात मुलीला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश सातभाई यांच्या नेतृत्वाखालील उपचार करण्यात आले. त्यामुळे गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी भारत हा आशेचा किरण ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.