

भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
खर्डी, ता. ३० (बातमीदार) : मुंबई-आग्रा महामार्गावरील भातसा फाट्याजवळ खर्डी येथे एका दुचाकीस्वाराचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये पोपट निवृत्ती बिन्नर (वय ५५) हे दूध विक्रीसाठी आपल्या दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत बिन्नर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खर्डी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या धडक दिलेल्या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये दोन म्हशी, एक रेडा व २० च्या आसपास पारडू आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थलावरून ट्रकचालकाने पळ काढला असून याप्रकरणी खर्डी पोलिसांनी दूरक्षेत्रात अवैध जनावर वाहतूक व अपघातप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही जनावरे अघई येथील गो शाळेत रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुनिल संसारे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.