

भाजप पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला
भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : भाजपच्या मिरा भाईंदर जिल्हा सचिवावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना भाईंदर पश्चिम येथे घडली आहे. राजन पांडे असे पदाधिकाऱ्यांचे नाव असून तो हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजन पांडे व विनोद राजभर यांच्यात जुन्या वैमनस्यातून भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली येथे झटापट झाली. त्यात राजभर याने पांडे यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मिरा रोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी पांडे यांच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान भाईंदर पोलिसांनी विनोद राजभर याला अटक केली आहे. राजभर हादेखील झटापटीत जखमी झाला असल्याने त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.