पदवी, पदव्युत्तरच्या शुल्काच्या माहितीबाबत टाळाटाळ!
शिक्षण शुल्काच्या माहितीबाबत टाळाटाळ!
विद्यार्थी संघटनांचा आरोप
मुंबई, ता. ११ : राज्यातील सर्व अनुदानित आणि खासगी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे त्यांच्याशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्था, वरिष्ठ महाविद्यालयांकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रत्येक अभ्यासक्रमांसाठी किती शुल्क आकारण्यात आले, त्यासाठीचे कोणते निकष संस्थांनी पाळले, यासाठीची माहिती देण्यासाठी विद्यापीठांसह वरिष्ठ महाविद्यालयांकडूनही टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयस्तरावर आकारण्यात येत असलेल्या शैक्षणिक आणि इतर शुल्काची माहिती जाहीर करण्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांशी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. व्यावसायिक, पारंपरिक आदी सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण संस्थांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांसाठीच्या शुल्काची माहिती नोटीस बोर्डासह आपल्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी सूचना केल्या आहेत. शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क नियंत्रण समित्यांकडूनही यासाठीच्या सूचना दिल्या जातात; मात्र काही शैक्षणिक संस्थांचा अपवाद वगळता बहुतांश संस्थाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षांत शिक्षण शुल्क तसेच इतर कोणत्या प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आले, याची कोणतीही माहिती जाहीर करत नसल्याने याविरोधात काही विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला आहे.
...
भरमसाट शुल्कआकारणी...
मुंबईसह राज्यातील असंख्य अनुदानित महाविद्यालयांमध्ये इतर शुल्कांच्या नावाने विद्यार्थ्यांकडून भरमसाट शुल्क आकारले जात असून त्यावर उच्च शिक्षण विभागाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचा आरोप विद्यार्थी नेते अमर एकाड यांनी केला आहे. सर्व प्रकारच्या शुल्क आणि खर्चाचा ताळेबंदही दरवर्षी जाहीर करणेही आवश्यक असताना तो केला जात नाही. यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकादा शुल्क वसुलीचा धंदा वाढला आहे; मात्र उच्च शिक्षण विभाग याकडे लक्ष नसल्याचे एकाड यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.