विसर्जन मिरवणूकांना खड्ड्यांचे विघ्‍न

विसर्जन मिरवणूकांना खड्ड्यांचे विघ्‍न
Published on

विसर्जन मिरवणुकांना खड्ड्यांचे विघ्‍न
धारावीतील रस्त्यांची दुरवस्था
धारावी, ता. १५ (बातमीदार) : धारावीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाचे आगमन आणि आता विसर्जन करण्यासाठी धारावीकरांना खड्ड्यांतून जावे लागत आहे.
गणेशोत्‍सवाच्या आधी रस्‍त्‍यांची डागडुजी झाली नसल्‍याने भाविकांनी संताप व्यक्‍त केला होता. सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्ती आगमनावेळी पालिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्‍या. यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्‍यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. त्‍यानंतर तात्‍पुरती डागडुजी करण्यात आली, मात्र पुन्हा रस्‍त्‍यांची दुरवस्‍था झाल्‍याने आता गणेश विसर्जनसुद्धा दुरवस्था झालेल्या रस्त्यांवरूनच करायचे का, असा सवाल स्थानिक विचारीत आहेत. खराब रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. त्यातूनच वाहनचालकांना वाहने न्यावी लागत आहेत, तर पादचाऱ्यांनादेखील साचलेल्‍या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या मुंबईत पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. गणेश विसर्जनादरम्‍यान एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाहतूक काेंडी
दुरवस्था झालेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसुद्धा होत आहे. मध्य रेल्वेवरील शीव स्थानकासमोरील वाहतूक पूल बंद केल्याने वाहने धारावीतील अंतर्गत रस्त्यांवरून वळवण्यात आली आहेत. त्यामुळे धारावीतील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पालिका प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देवून रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ
धारावी ः ९० फूट रस्त्यावरील कामराज हायस्कूलसमोर खचलेल्या रस्त्यावर साचलेले पाणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com