बुधवारपासून अकरावी प्रवेशासाठी सहावी विशेष फेरी

बुधवारपासून अकरावी प्रवेशासाठी सहावी विशेष फेरी
Published on

अकरावी प्रवेशासाठी सहावी विशेष फेरी

मुंबई, ता. १५ : मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या केंद्रीय प्रवेशासाठी सहाव्या (डेली मेरिट राऊंड) डीएमआर या विशेष फेरीचे वेळापत्रक आज माध्यमिक शिक्षण सहसंचालकांनी जाहीर केले. यात केंद्रीय प्रवेशासोबत कोट्यातील प्रवेशाच्या फेरीसाठी बुधवारी (ता. १८) नोंदणीला सुरुवात होणार आहे.
ही फेरी यंदाच्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम फेरी असल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे. या फेरीदरम्यान महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनाही आपले प्रवेश रद्द करता येणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. सहाव्या विशेष फेरीसाठी केंद्रीय आणि कोट्यातील प्रवेशासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ऑनलाइन अर्ज, पसंतीक्रम भरता येतील. तसेच, या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत एटीकेटी सवलत मिळालेली आहे, तेही सहभागी होतील. शिवाय कोट्यातील प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना पसंतीक्रम हा २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदवता येईल. ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जाहीर केली जाणार आहे. या गुणवत्ता यादीचे कट ऑफ महाविद्यालयांच्या पोर्टलवर दर्शविले जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती पुरविली जाणार आहे.
अकरावीच्या या डीएमआर फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन २५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक असेल. यात व्यवस्थापन आणि इनहाऊस कोट्यातील प्रवेशांनाही हेच नियम लागू असतील. त्यानंतर विभागाकडून अकरावीच्या प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांची संख्या जाहीर केली जाणार आहे.
...
डीएमआरवरून संभ्रम
शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी डेली मेरिट राऊंड म्हणजेच डीएमआर या सहाव्या विशेष फेरीचे आयोजन १८ सप्टेंबरपासून करण्याचे जाहीर केले आहे. ही फेरी शेवटची विशेष फेरी असल्याचेही नमूद केले आहे. दुसरीकडे या फेरीनंतर डेली मेरिट राऊंड ही डीएमआर फेरी होईल आणि त्यासाठीचे वेळापत्रक अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असेही नमूद केल्याने नेमकी ही प्रवेशप्रक्रिया आणि त्यांच्या फेऱ्या कधी संपणार आहेत, यावरून विभागाकडून संभ्रम निर्माण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com