

महाराष्ट्रात येणार गुजरातची वीज
‘अदाणी’कडून पाच हजार मेगावॉटची खरेदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महाराष्ट्राच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असून ती पूर्ण करण्यासाठी महावितरण आता गुजरातमधून वीज आणणार आहे. अदाणी ग्रीन एनर्जीच्या गुजरातमधील सौरऊर्जा प्रकल्पातून पाच हजार मेगावाॅट वीज घेतली जाणार आहे. त्यासाठी महावितरणने अदाणी एनर्जीला पत्र दिले आहे. तसेच, लवकरच वीज खरेदी करार होणार आहे.
अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा येथे जगातील सर्वांत मोठे सोलर पार्क आहे. त्यामध्ये तयार होणारी वीज महावितरणला प्रतियुनिट सुमारे २.७० रुपये दराने मिळू शकणार आहे. पुढील तीन वर्षांत ही वीज महावितरणला मिळेल, असे दिसत आहे. ही वीज महावितरणला मिळाल्यास भविष्यातील वाढत्या विजेची मागणी पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान, अदाणी पाॅवर लिमिटेडच्या सुमारे १,६०० मेगावाॅट क्षमतेच्या अल्ट्रा सुपर क्रिटीकल थर्मल वीज केंद्रातून १,४९६ मेगावाॅट वीज २५ वर्षांच्या दीर्घकालीन कराराद्वारे घेतली जाणार आहे. त्याबाबतचा वीज खरेदी करारही लवकरच होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.