

जागृती मंच सामाजिक क्षेत्राला आदर्श वाटणारी संस्था
आमदार आदित्य ठाकरे यांचे गौरवोद्गार ः मंचाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम
मुंबई, ता. १५ ः जागृती मंच संस्थेकडून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे सामाजिक क्षेत्राला आदर्श वाटणारी ही संस्था आहे, असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी काढले.
जागृती मंच या संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी राज्यमंत्री तथा आमदार सचिन अहिर, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर, संस्थेचे अध्यक्ष राम साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या जागृती मंचने अनेक उपक्रम राबवताना विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा विशेष विचार केल्याचे दिसून येते, असे ठाकरे म्हणाले. जागृती मंचला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती आपण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे मी नेतृत्व करतो. त्याच मतदारसंघात ही संस्था कार्य करते, हे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले. जागृती मंच हे एक कलाकारांची निर्मिती करणारे व्यासपीठ आहे, असे अजय चौधरी यांनी सांगितले. जागृती मंच समाजोपयोगी विविध उपक्रम राबवित असते, त्यांचे हे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे सुनील शिंदे म्हणाले. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा हस्ते गुणगौरव करण्यात आला. सूत्रसंचालन आनंद खेडकर यांनी केले. महादेव दोरुगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर ‘यदा कदाचित रिटर्न’ या नाटकाचे सादरीकरण झाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव विष्णू कणेरकर, चंद्रकांत गावडे, ओमकार साळगावकर, दीपक आजगेकर, अनिल जाधव, अनिल पाटकर, महादेव दोरुगडे, विश्वास पाटील, संदीप पाटणकर, विश्वंभर साळगावकर, संतोष आकेरकर, कुश पाटील, अमर साळवी, गणेश तुपे, अक्षय मोरे, समृद्धी कोयंडे, सागर कारंडे, प्रीतम साळवी, मंगेश कुवेकर, संजय पाटील, शीतल जाधव, सुजाता पाटकर, रुचिरा सावंत, विजया कनेरकर, शीतल साळगावकर, भारती आजगेकर, पुष्पा दोरुगडे, प्रतिभा साळगावकर, युगंधरा कनेरकर, प्रिया साळवी यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.