‘महा नोकरी’ मेळाव्याचे ठाकरे गटाकडून आयोजन
‘महा नोकरी’ मेळाव्याचे
ठाकरे गटाकडून आयोजन
१२५ कंपन्यांचा सहभाग; १० हजार युवकांना रोजगार देणार
मुंबई, ता. २९ : महायुती सरकारच्या कार्यकाळात राज्यात वाढलेल्या बेराजगारीच्या पार्श्वभूमीवर मराठी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शनिवारी (ता. ५) रोजी ‘महा नोकरी’ मेळाव्याचे आयोजन केले आहे. विलेपार्ले पूर्व येथे होणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई पदवीधरचे आमदार ॲड. अनिल परब यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनपूर्तीनिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात लॉजिस्टिक, बँकिंग, इन्शुरन्स, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण, बांधकाम, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, आदी क्षेत्रांतील ॲमेझॉन, हिंदुजा, एचडीएफसी, एसबीआय, बजाज, टाटा एआयजी, एअरटेल, आयसीसी लोम्बार्ड अशा नामांकित १२५ कंपन्या सहभागी होणार आहेत. हा मेळावा विलेपार्ले पूर्वला ई-१८, एमएलसीपी पार्किंग, टॉवर एक तळमजला, सहारा हॉटेलजवळ, एटीसी टॉवरसमोर, बालाजी रेस्टॉरंट येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत होणार आहे. या मेळाव्यासाठी आतापर्यंत आठ हजार युवकांनी नावनोंदणी केली असून पुढील चार दिवसांत ती १५ हजारपर्यंत जाईल. मेळाव्याला येताना युवकांनी बायोडेटा, केवायसी कागदपत्रे आणि स्वतःचे छायाचित्र आणायचे आहे. या मेळाव्यात सुमारे १० हजार युवकांना रोजगार मिळणे अपेक्षित असल्याचे आयोजक ॲड. अनिल परब यांनी सांगितले. नोकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdPR_-WoRBnI7EjM9VP2j5mrBB5uny6OVT-XZB64ZEtBbrM4Q/viewform या लिंकवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
---
१०० दिवसांत आश्वासनपूर्ती
शिवसेनेने आतापर्यंत अनेक रोजगार मेळावे घेतले आहेत; मात्र सुमारे १० ते १२ हजार युवकांना नोकरी देणारा महामेळावा प्रथमच होत आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती म्हणून दरवर्षी ‘महा नोकरी’ मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. आश्वासनांची वचनपूर्ती शंभर दिवसांत करत असल्याचे ॲड. परब यांनी सांगितले.
---
उद्योगांचे स्थलांतर रोखणार!
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास राज्यातील बेरोजगारीवर लक्ष केंद्रित करेल. प्रामुख्याने गुजरातमध्ये स्थलांतरित होत असलेले उद्योग रोखले जातील. आपले सरकार आल्यास तरुणांना अधिक नोकऱ्या देण्यासाठी व सरकारी रिक्त जागा भरण्याचे काम वेगात केले जाईल. मविआ सरकारच्या काळात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे तीन-चार कार्यक्रम झाले; परंतु सध्याच्या महायुतीचे सरकार त्यातील उद्योग महाराष्ट्रात टिकवून ठेवण्यात अपयशी ठरले, असा आरोप ॲड. परब यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.