पावसामुळे डोंगरावरील माती, दगड रस्‍त्‍यावर

पावसामुळे डोंगरावरील माती, दगड रस्‍त्‍यावर
Published on

रोहा, ता. ३० (बातमीदार) ः तालुक्यात परतीच्या पावसाने चार-पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. त्‍यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, डोंगर भागात संततधार पावसामुळे डोंगराळ भागातील माती, दगड रोहा-तांबडी मार्गावर आले होते. त्‍यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वृक्षतोड, वणव्यांमुळे डोंगराचा काही भाग सैल झाला असून मुख्य रस्त्यावरही माती, दगड येण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रोहे शहर व ग्रामीण भागात विशेषतः कोलाड, तांबडी, भालगाव, नागोठणे, चणेरा या भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसामुळे रोहा-तांबडी रस्त्यावरील हनुमान टेकडीच्या काही अंतरावर असलेल्या डोंगराचा भाग सुटून शनिवारी (ता. २८) मध्यरात्री रस्त्यावर माती, दगडांचा मलबा आला होता. हा मुख्य रस्ता अनेक वाड्या-वस्त्यांना जोडला असून प्रशासनाने योग्य त्‍वरित दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक तसेच स्‍थानिकांकडून करण्यात येत आहे.

सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात दगड कोसळण्याची शक्यता आहे. मुख्य मार्ग बंद होऊन ग्रामस्‍थ व वाहनचालकांची गैरसोय होऊ शकते. या रस्त्यावरून शेकडो शाळकरी मुले प्रवास करतात. रोहा ते तळा व रोहा ते मुरूड असा हा जोडरस्ता असल्यामुळे असंख्य पर्यटक व प्रवाशांची रोज वर्दळ असते. त्‍यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रस्‍त्‍यालगत संरक्षक भिंत उभारण्यात यावी.
- संकेत मोरे, प्रवासी, रोहा

पावसामुळे डोंगरावरील माती, दगडांचा मलबा रस्‍त्‍यावर आला आहे. जेसीबीच्या साह्याने तो बाजूला करून मुख्य मार्गावरील अडथळा दूर करण्यात आला आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करणार असून भविष्यात अशा घटना परत घडू नये, म्हणून योग्य उपाययोजना करणार आहे.
- विजय बागुल, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहा

रोहा ः परतीच्या पावसामुळे तांबडी मार्गावरील दगड, माती वाहून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com