

भायखळा स्थानकात स्वच्छता मोहीम
धारावी, ता. ३ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील भायखळा स्थानकात ‘स्वच्छता हीच सेवा- स्वच्छ, निसर्ग, स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या मोहिमेंतर्गत रविवारी (ता. २९) संत निरंकारी मिशनच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रेल्वेचे अधिकारी व स्थानिक आमदार यामिनी जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समाजाला स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी संत निरंकारी मिशनतर्फे भायखळा स्थानक परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी पथनाट्ये सादर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भायखळा स्थानकाच्या आसपासच्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगून स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच, वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत रस्ते व पदपथांची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, भायखळा स्थानक कर्मचारी, रेल्वे पोलिस दल आणि स्थानिक नागरिकांनी मोहीम यशस्वी केल्याची माहिती भायखळा स्थानकाचे स्थानक प्रबंधक गणेश पी. स्वाइन यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.