उड्डाणपुलावर प्लॅस्टिक स्प्रिंग बोलार्ड यंत्रणा

उड्डाणपुलावर प्लॅस्टिक स्प्रिंग बोलार्ड यंत्रणा
Published on

उड्डाणपुलावर प्लॅस्टिक स्प्रिंग बोलार्ड यंत्रणा
अपघात रोखण्यास मदत
ठाणे शहर, ता. ३० (बातमीदार) : घोडबंदर आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर ब्लॅक स्पॉट ठरत असलेल्या उड्डाणपुलांवर प्लॅस्टिक स्प्रिंग बोलार्ड आणि हायलाइटर यंत्रणा उभी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गावरील पुलांवर मागील काही दिवसांपासून सुरू असणारी अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे अशा जागांवर ही यंत्रणा बसवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, ठाणे महापालिका, रस्ते विकास महामंडळ हे काम करत आहे.

ठाणे वाहतूक पोलिस आयुक्तालयातील हद्दीत असलेली अपघाताची ठिकाणे कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार आयुक्तालयातील ३७ पैकी १२ ब्लॅक स्पॉट कमी करण्यात वाहतूक विभागाला यश आले आहे; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घोडबंदर आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील पुलांच्या चढणीच्या जागा जीव घेणाऱ्या ठरत आहेत. या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेक अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी ही ठिकाणे वाहनचालकांना दिसत नसल्याने वाहने उड्डाणपुलांच्या भिंतींवर चढून गंभीर अपघात होत आहेत.

रात्रीच्या वेळी या मार्गावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. एका रात्रीत हजारो अवजड वाहने गुजरात आणि नाशिकच्या दिशेने जातात. त्यातील काही वाहने पुलांच्या भिंतींना धडकत असतात. ठाण्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर तीन उड्डाणपूल आहेत. या पुलांवर अलीकडील दोन महिन्यात अनेक अपघात झाले आहेत, तर घोडबंदर मार्गावर असलेल्या उड्डाणपुलांच्या भिंतीदेखील अपघात होणारी ठिकाणे ठरत आहेत. या मार्गावर चार उड्डाणपूल असून त्यातील मानपाडा आणि वाघबीळ या दोन उड्डाणपुलांवर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे वारंवार अपघात होत असल्याने उड्डाणपूल ब्लॅक स्पॉट ठरू लागले आहेत. दैनिक सकाळने याबाबत मागील महिन्यात १३ सप्टेंबरला '' घोडबंदर मार्गावरील ब्लॅक स्पॉट उड्डाणपूल'' या मथळ्याखाली वृत्त छापले होते. आता उड्डाणपुलांवर संबंधित विभागांकडून प्लॅस्टिक स्प्रिंग बोलार्ड आणि हायलाइटर आणि रात्री हायलाइटर यंत्रणा बसविली जात आहे. रात्रीच्या वेळी ही यंत्रणा वाहनचालकांना पुलावर चढण्याआधी लांबूनच धोकादायक ठिकाणांबाबत सावध करते.

मुंबईकडून नाशिक, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या नितीन कंपनी, कॅटबरी कंपनी आणि ज्युपिटर रुग्णालय येथील तीनही उड्डाणपुलांच्या ठिकाणी दोन्ही वाहिनीवर ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.
माजिवडा, मानपाडा, वाघबीळ, या पुलांच्या अपघात प्रवण ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येत आहे.

काही पुलांच्या ठिकाणी अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे. याची विभागाने खंबीर दखल घेतली आहे. चालकांना रात्रीच्या वेळी अशी ठिकाणे ठळकपणे दिसून यावीत, यासाठी वाहतूक विभागाने महापालिका सार्वजनिक बांधकाम खाते आणि रस्ते विकास महामंडळ अशा संबंधित विभागाला येथे सुरक्षा यंत्रणा उभी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अशा ठिकाणी प्लॅस्टिक स्प्रिंग बोलार्ड आणि हायलाइटर बसवले आहेत.
पंकज शिरसाट, उपआयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com