

पश्चिम रेल्वेवर लोकल वाहतुकीचे तीनतेरा
- सहाव्या मार्गिकेमुळे सततचे मेगाब्लॉक; १७५ लोकल फेऱ्या रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या ३५ दिवसांपासून गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेतला आहे, तसेच सोमवार, ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत गोरेगाव ते मालाड स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक आणि वेगमर्यादेमुळे १५० ते १७५ लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. हे काम रात्रीचा मेगाब्लॉक घेऊन करण्यात येत आहे. हा ब्लॉक गोरेगाव स्थानकात अप-डाऊन जलद मार्गावर आणि मालाड स्थानकात अप-डाऊन जलद, तसेच धीम्या मार्गावर घेण्यात येत आहे.
सोमवारपासून सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी राममंदिर-गोरेगाव-मालाड यादरम्यान अप-डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर प्रतितास ३० किमी वेगाचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे १५० ते १७५ लोकल रद्द केल्या जाणार आहेत. ४ ऑक्टोबरनंतर ब्लॉक कालावधी वगळता उपनगरी लोकलची सेवा सुरळीत सुरू होणार आहे.
पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल
रात्रकालीन ब्लॉक आणि राममंदिर-गोरेगाव-मालाड यादरम्यान अप-डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर प्रतितास ३० किमी वेगाचे बंधन घातल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. सोमवारी सकाळी गोरेगाव स्थानकांतील लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे गोरेगाव स्थानकात सकाळच्या पीक अवरच्या वेळी एकच गर्दी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने धावत असल्याने आठवड्याचा पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.