स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच

स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच
Published on

स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
अक्षय शिंदेला दफन केलेल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर प्रशासनाने बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला आहे; मात्र हा विधी प्रक्रिया करण्यापूर्वी झालेला विरोध लक्षात घेता पोलिसांनी अक्षयला दफन केलेल्या जागेच्या सभोवताली दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून याठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

बदलापूर येथील दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) मुंब्रा बायपासवर पोलिस चकमकीत मृत्यू झाला. यावरून राजकारण तापत असतानाच मंगळवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याला ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले होते. बदलापूरमध्ये त्याच्या दफनविधीला विरोध होत असल्याने सुरुवातीला पोलिसांनी संयमी भूमिका घेतली. दरम्यान, बदलापूरव्यतिरिक्त नजीक असलेल्या शहरांतील शासकीय स्मशानभूमीचा शोध सुरू झाला. तिथेही विरोध होऊ लागला. अखेर त्याच्या आई-वडिलांनी न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने तत्काळ दफनविधी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर उल्हासनगरात पोलिस बंदोबस्तात अक्षयच्या दफनविधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान, या दफनस्थळावर कोणतीही अनुचित घटना घडू नये; यासाठी मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दोन सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसवले असून याठिकाणी पोलिसांची व्हॅन आणि बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

..
स्थानिकांचा विरोध
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी (ता. २९) सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी स्मशानभूमीमध्ये धाव घेऊन नागरिकांसोबत येथील तृतीयपंथींनीही विरोध केला. शेवटी पोलिसांचा ताफा आल्यावर या गर्दीची पांगापांग झाली, तर काहींना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com