

कासा, ता. ३ (बातमीदार) : पालघर-ठाणे मजूर सहकारी संस्था संघाच्या (फेडरेशन) संचालकपदी डहाणूचे कुशल राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मजूर सहकारी संघाच्या कार्यक्षेत्रात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राऊत यांची निवड पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. या पदावर ते संघाच्या कामगिरीला नवी दिशा देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कुशल राऊत बांधकाम व्यवसायात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे आणि बांधकाम क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची प्रसिद्धी वाढली आहे. ते डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले यांचे जवळचे विश्वासू सल्लागार आणि खासगी स्वीय सहाय्यक म्हणूनही काम करतात. ज्यामुळे त्यांना नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे. राऊत यांच्या बिनविरोध निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या साठी त्यांना सर्वपक्षीय सहकार्य मिळाले. मजूर सहकारी संघाच्या संचालकपदावर बिनविरोध निवड झाल्यामुळे आनंद झाला आहे. तळागाळातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा आणि संधी निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे कुशल राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.