भिवंडीत''स्वच्छता मॅरेथॉन दौड

भिवंडीत''स्वच्छता मॅरेथॉन दौड
Published on

भिवंडीत ‘स्वच्छता मॅरेथॉन दौड’
‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता’ अभियानाचा समारोप

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवडा ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत भिवंडी महापालिकेने विविध कार्यक्रम राबवले. स्वच्छता ही सेवा पंधरवडा अभियानाचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व स्वच्छ भारत अभियान दिवसानिमित्ताने ‘स्वच्छता मॅरेथॉन दौड’ कार्यक्रमाने करण्यात आला.

भिवंडी- निजामपूर पालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्वच्छता मॅरेथॉन दौड’चे आयोजन केले होते. यात ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वंजारपाट्टी चौक, एसटी बस स्थानकमार्गे पालिका मुख्यालय असा मॅरेथॉनचा मार्ग होता. आयुक्त अजय वैद्य यांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व, स्वच्छता ही निरंतर चालणारी सेवा, स्वच्छतेच्या कामातील सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान व महत्त्व, स्वच्छ भारत अभियानातील पालिकेची कामगिरी व शहराच्या स्वच्छतेत नागरिकांची भूमिका या विविध विषयांवर पालिका अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. स्वच्छता ही निरंतर चालणारी सेवा आहे.

विद्यार्थी हेच उद्याचे सुजाण नागरिक असल्याने शालेय शिक्षणासोबतच स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे ही शिक्षकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, असे मत आयुक्त अजय वैद्य यांनी व्यक्त केले. ‘स्वच्छता मॅरेथॉन दौड’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकप्राप्त विद्यार्थी गट व विद्यार्थिनी गट असे एकूण १८ पुरस्कारांचे वितरण पालिका मुख्यालयात करण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या विषयांवर पथनाट्य सादर केले.

‘स्वच्छता मॅरेथॉन दौड’ कार्यक्रमात उपायुक्त (आरोग्य) किरण तायडे, उपायुक्त (समाजकल्याण विभाग) प्रणाली घोंगे, प्र. शहर अभियंता सचिन नाईक, उपायुक्त (शिक्षण विभाग) बाळाराम जाधव, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) अजय महाडिक, सहाय्यक आयुक्त (आरोग्य) फैसल तातली, सहाय्यक आयुक्त (शिक्षण) प्रकाश राठोड, आरोग्य अधिकारी जयवंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com