बंद वाहनांवर वाहतूक विभागाचा उतारा

बंद वाहनांवर वाहतूक विभागाचा उतारा
Published on

बंद वाहनांवर वाहतूक विभागाचा उतारा
बंद वाहनांवर वाहतूक विभागाचा उतारा
महिनाभरात ३७९ अवजड वाहने बाजूला

ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) : शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महामार्गांवर बंद पडणाऱ्या वाहनांमुळे या कोंडीत अधिकच भर पडते; मात्र आता महामार्गांवर बंद पडणारी अवजड वाहने तत्काळ काढून टाकणारी यंत्रणा ठाणे वाहतूक विभागाने सक्रिय केली आहेत. महिनाभरात या विभागाने महामार्गांवर बंद पडलेली ३७९ वाहने बाजूला करण्याचे काम केले आहे; मात्र ही बंद पडलेली वाहने बाजूला करण्यासाठी वाहतूक विभागाला तारेवरची कसरत करावी लागली.

ठाणे आयुक्तालयातून इतर राज्यात जाणारे महामार्ग महत्त्वाचे आणि जास्त वर्दळ असलेले आहेत. यावरून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक होते. जेएनपीटी बंदरातून गुजरात राज्यात जाणारी कंटेनर वाहतूकदेखील शहरातील या मार्गांवरून होते. अशावेळी एखादे अवजड वाहन रस्त्यात बंद पडले, तर ते बाजूला करणे मोठे अवघड काम असते, तसेच अपघात झालेले वाहन तत्काळ बाजूला केले नाही, तर काही मिनिटांतच मोठी वाहतूक कोंडी होते. ही बाब विचारात घेत ठाणे शहर वाहतूक विभागाने जड वाहनांना उचलणारी क्रेन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. २४ तास ही यंत्रणा सतर्क राहते. अपघात अथवा वाहन बंद पडल्याच्या ठिकाणी काही मिनिटांत पोहोचून ते वाहन तेथून बाजूला करते. सप्टेंबरमध्ये या विभागाने आयुक्तालयातील महामार्गांवर बंद पडलेली व अपघात झालेल्या ४३३ वाहनांपैकी ३७९ वाहने तेथून काढून टाकत तो मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून दिला आहे.

महामार्गांवर बंद पडलेली अथवा अपघातग्रस्त वाहने उचलून बाजूला करण्यासाठी वाहतूक विभागाकडे सक्षम क्रेन यंत्रणा आहे. ही यंत्रणा जड अवजड वाहने सहजपणे बाजूला करते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभाग अहोरात्र कार्यरत आहे.
पंकज शिरसाट, उपआयुक्त वाहतूक विभाग, ठाणे शहर


विभाग बंद वाहनांची संख्या बाजूला केलेली वाहने
कासारवडवली,
घोडबंदर रोड - २०० - २००

कापूरबावडी,
घोडबंदर रोड - ६९ - ३६

नारपोली,
मुंबई नाशिक महामार्ग - ९५ - ८४

कोन गाव,
मुंबई नाशिक महामार्ग - २८ - २४

मुंब्रा,
मुंब्रा बायपास - ४१ - ३५

एकूण बंद - ४३३ - ३७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com