

दहिसरमध्ये बालिकेचा विनयभंग
अंधेरी, ता. ३ (बातमीदार) ः दहिसर येथे एका तीन वर्षांच्या मुलीचा तिच्या पित्याने विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच ३२ वर्षांच्या आरोपी पित्याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
सोमवारी (ता. ३०) उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत दहिसरला राहते. तीन दिवसांपूर्वी तिच्या पित्याने तिला घरात बेदम मारहाण केली होती. तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच तिने दहिसर पोलिस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री उशिरा आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुपारी विशेष सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.